Breaking News

नागोठण्यात आषाढी एकादशी उत्साहात

नागोठणे : प्रतिनिधी  – देवशयनी अर्थात आषाढी एकादशी नागोठणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने येथील होली एंजल्स स्कूल, भाएसोची एस. डी. परमार इंग्लिश शाळा तसेच तोरणा इंग्लिश मीडियम स्कूल आदी शाळांमधील विद्यार्थ्यांची पारंपरिक वेषात काढण्यात आलेली वारकरी दिंडी शहरात फिरविण्यात आली. मुख्य कार्यक्रम येथील ज्ञानेश्वर मंदिरात संपन्न झाला. पहाटे चार वाजता काकड आरतीने शुभारंभ करण्यात आला. पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. सकाळी शाळांच्या दिंडींचा मंदिरात स्वागत समारंभ पार पडल्यानंतर शहरासह विभागातील वारकरी मंडळींच्या भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी हरिपाठानंतर दिवसभराच्या या धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली. दिवसभरात हजारो भाविकांनी मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply