Breaking News

पत्रकार अतुल पाटील यांच्या निधनाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शोक व्यक्त

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील ज्येेष्ठ पत्रकार अतुल पाटील यांचे नुकतेच निधन झाले. अतुल पाटील यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही अतुल पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कोरोनाने पुन्हा एकदा आपल्या राज्यात, देशात तसेच जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य माणसाची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. समाजातील प्रत्येक घटकात कोरोनामुळे हलाखीची परिस्थिती पसरत असल्याने अतिशय वेदना होत आहेत. त्यातच उरणचे पत्रकार मित्र अतुल पाटील यांचे निधन झाल्याने दुःख होत आहे.
पाटील यांच्या आजारपणाबद्दल समजल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांना सांगून अ‍ॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरची सोय करण्यात आली, मात्र शेवटी त्यांना कोरोनाच्या रूपात काळाने गाठलेच, अशी हळहळ लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.
अतुल पाटील यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांनासुद्धा काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यात त्यांची पत्नी कोरोनावर मात करून घरी परतली आहे, तर त्यांची मुले कोरोनावर उपचार घेत आहेत. तीदेखील लवकरात लवकर बरी होऊन घरी परतावीत अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो, असेही ते या वेळी म्हणाले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply