Breaking News

गरजूंना घरी जाण्यासाठी मोफत रिक्षासेवा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने साजर्‍या करण्यात येणार्‍या कार्यक्रमाअंतर्गत राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे रोज 70 गरजवंत कामगारांना घरी सोडण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. गुरुवारपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत मोफत रिक्षासेवा नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट तेजीमध्ये असल्याकारणामुळे राज्य सरकारच्यावतीने एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यादरम्यान कार्यालये व सार्वजनिक वाहतूक सुरू असल्यामुळे अनेक नागरिकांना कामावरून परतताना उशीर होतो. रात्री आठ वाजल्यानंतर संचारबंदी असल्याकारणामुळे त्यांना आपापल्या घरी जाताना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. याची जाणीव ठेवूनच संचारबंदी लागू झाल्यानंतर कामावरून परत जाणार्‍या गरजवंत नागरिकांना घरी जाण्यासाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने विनामूल्य रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरजवंतांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी नागरिकांना केले आहे.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply