भिंगारवाडी (ता. पनवेल) : भाजप युवा मोर्चा पळस्पे जि. प. विभागीय अध्यक्ष व माजी सरपंच योगेश लहाने यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेल्या बस थांब्याचे उद्घाटन त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी लहाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.