Monday , February 6 2023

मुरूडमध्ये युवा स्पंदन स्पर्धा उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी

कोंकण उन्नती मित्र मंडळ संचालित वसंतराव नाईक महाविद्यालयाने नुकताच युवा स्पंदन 2020 हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुभाष महाडिक यांच्या हस्ते झाले.

सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मधुकर वेदपाठक यांनी प्रास्ताविक केले. नजीरभाई चोगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला वासंतीताई उमरोटकर, नगरसेविका आरती गुरव यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सीमा नाहिद यांनी केले.प्रा. गजानन मुनेश्वर यांनी आभार मानले.

महोत्सव यशस्वी कारण्यासाठी सेजल कारभारी, रफिक सय्यद, ममता कार्लेकर, मयांक तांबडकर, संजना सुतार, उत्कर्ष शहा, रोहन भोईर, मंदार पानवलकर, वीरेंद्र गायकर, फातिमा कादरी, रिया पेरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धांचे निकाल

वैयक्तिक गायन : प्रथम-मंदार पानवलकर, द्वितीय- धनश्री देवळाटकर, तृतीय- सादिक अन्सारी.

सामुहिक गायन : प्रथम-मोनिका मोरे गट, द्वितीय- रफिक व मंदार, तृतीय- फातिमा व आयेशा.

वक्तृत्व : प्रथम- ममता कार्लेकर, द्वितीय-सादिक अन्सारी, तृतीय-कृतिक पाटील.

कविता : प्रथम- मयांक तांबटकर,

द्वितीय-ममता कार्लेकर, तृतीय- मानसी पाटील व तृप्ती दांडेकर.

प्रश्नमंजुषा : प्रथम- रोहन भोईर व कृतिक पाटील, द्वितीय-वीरेंद्र गायकर व अश्विन विरकुड.,

वैयक्तिक नृत्य : प्रथम- ऋतुजा शाम, द्वितीय- मंदार पानवलकर,

समूह नृत्य : प्रथम- मोनिका गट, द्वितीय-ऋतुजा गट, तृतीय-  डॉसिंग गट व मंदार गट.

पोस्टर मेकिंग :  प्रथम- मन्सुरी सना व कृतिक गुंड, द्वितीय- संजना सुथार , तृतीय- सादिक अन्सारी. मेहंदी : प्रथम- आक्षदा पाटील, द्वितीय-सादिक अन्सारी.

स्पॉट फोटोग्राफी : प्रथम- अजय आयरकर,  द्वितीय-वीरेंद्र गायकर, तृतीय- मानसी पाटील, उत्तेजनार्ध- अभिजित सिंग.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply