Monday , February 6 2023

पालिका हद्दीत शौचालये बांधण्याची मागणी

नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी दिले आयुक्तांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीत शिवाजी नगर व नवनाथ नगर झोपडपट्टीमध्ये नव्याने शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी भाजप नगरसेविका वृशाली जितेंद्र वाघमारे यांनी केली आहे. यासाठी पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील शिवाजी नगर व नवनाथ नगर झोपडपट्टीमध्ये शौचालय नाही. त्यामुळे त्या ठिकाणी गैरसोय होते. तेथील नागरिकांना उघड्यावर शौचालयकरिता बाहेर जावे लागत आहे त्यामुळे त्या परिसरात रोगराई पसरत असून, नागरिक आजारी पडत आहेत. म्हणुन त्या परिसरातील नागरिक तेथे शौचालय बांधण्याची मागणी वारंवार करित आहे. त्यामुळे निवेदनाची दखल घेत त्वरीत शिवाजी नगर व नवनाथ नगर झोपडपट्टीमध्ये शौचालय बांधुन द्यावेत अशी मागणी केली आहे. आयुक्तांना निवेदन देताना नगरसेविका वृशाली जितेंद्र वाघमारे  यांच्यासह अशोक आंबेकर, संजय जाधव, रुपेश वाहुळकर, चंद्रभागा येडे, पोपट मुंगसे, राजू बोदोड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply