Breaking News

दुचाकीस्वारांनी मोबाईल खेचला

पनवेल : बातमीदार

रस्त्याने चालत घरी जात असलेल्या 27 वर्षीय तरुणाच्या हातातील 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना रोडपाली येथे घडली. याप्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत. रोडपाली येथील जयवंतसिंग मनजितसिंग धालीवाल हे रोडपाली येथील घरी रोडने पायी फोनवर बोलत जात असताना, त्यांच्याजवळून रोडपाली सेक्टर 17कडे एका बाईकवरून जाणार्‍या दोन अज्ञात इसमांनी हातातील सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 हा मोबाईल खेचून निघून गेले. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– मारहाण करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल कळंबोली येथील एका 23 वर्षीय चालकाला लोखंडी पाईपच्या सहाय्याने मारहाण व शिवीगाळ करणार्‍या आरोपीविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्दाम फकीरअलम खान (वय 23) हे काम केलेले पैसे मागण्यासाठी भारत रोडलाईन्स स्टील मार्केट मशीदजवळील रोड येथे गेले होतो. या वेळी साहेब आलम याने येथे शफीक नाही. तू येथे का आला, पैसे मागू नको असे म्हणाला. यावेळी दोघांमध्ये बोलाचाली होऊन साहेब आलम यांनी खान यांना धक्काबुक्की केली व लोखंडी पाईपच्या तुकड्याने मारहाण केली, तसेच डोक्यावर व पाठीवर मारहाण करून खान यांना जखमी केले, अशी तक्रार आहे.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply