Breaking News

सामाजिक उपक्रमातून नवरात्र उत्सव साजरा करावा -सहायक पोलीस निरीक्षक रंगराव पवार

मुरुड : प्रतिनिधी    

येथील जनतेने गणपती उत्सवात मोठे सहकार्य करून पोलिसांना मदत केली होती. त्याच प्रमाणे येणारा नवरात्र उत्सव सामाजीक भान राखून समजुतदारपणे साजरा करावा, असे आवाहन मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी येथे केले.

नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक तत्वाची माहिती जनतेला व्हावी,  यासाठी मुरुड पोलीस ठाण्यात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य आदेश दांडेकर, नारायण पटेल, हितेंद्र पंड्या, मनोहर मकु, बाळकृष्ण गोंजी, सिद्धेश गद्रे यांच्यासह  शहरातील नवरात्रोत्सव मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. नवरात्र मंडळांनी रक्तदान शिबिर, सॅनिटायझर अथवा मास्क वाटप अशा कार्यक्रमांना महत्व देऊन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी हा सण साजरा करावा, असे रंगराव पवार यांनी यावेळी सुचीत केले.

सहायक पोलीस निरीक्षक पवार यांनी शासनाकडून आलेल्या पत्राचे वाचन केले. सार्वजनिक मंडळाची मूर्ती चार फूट तर घरगुती मूर्ती दोन फूट असणार आहे. मंडप उभारताना नगरपरिषदेची परवानगी घ्यावी, मंडपात दर्शनाला अधिक लोक येत असतील तर सदरचा परिसर निर्जतुकीकरण करून घ्यावा, आगमन व विसर्जन यावेळी कोणतीही मिरवणूक काढू नये, वाद्य वाजू नये, कोव्हीड 90  पासून बचाव करण्यासाठी योग्य त्या उपयोजना करून शासनास सहकार्य करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा शांतता कमिटी सदस्य आदेश दांडेकर यांनीही यावेळी नवरात्रोत्सव मंडळांना मार्गदर्शन केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply