पाटणा : वृत्तसंस्था
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (सीएए) शाहीन बाग येथे आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शर्जीलचा मुख्य सहभाग असून, प्रक्षोभक भाषणांसाठी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांची पाच पथके शर्जीलच्या मागावर होती. दिल्लीसह पाटणा व मुंबईतही काही ठिकाणी छापे टाकण्यात आले होते, मात्र शर्जील हाती लागला नव्हता. अखेर जहानाबादमधील काको येथून मंगळवारी (दि. 28) त्याला अटक करण्यात आली.
Check Also
वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन
पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …