खोपोली ः प्रतिनिधी
येथील प्रख्यात वकील विकास म्हात्रे यांच्या प्रयत्नाने टाटा कंपनीच्या सायमाळ क्रीडांगणात क्रीडा महोत्सव साजरा झाला. या वेळी दिवाणी न्यायाधीश सोनपरी गाडे उर्फ ब्राह्मणे यांच्या हस्ते आणि
दिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे, सरकारी वकील सतीश नाईक, श्री. ब्राह्मणे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यात आला.
वकील न्यायाधीश व कर्मचारी असे एकूण चार संघ तयार करून कोर्ट ‘ए’ संघाचे नेतृत्व सहन्यायाधीश धोंडगे, कोर्ट ‘बी’चे अॅड. महेश भद्रिके, कोर्ट ‘सी’चे अॅड. मनोज पाटील आणि कोर्ट ‘डी’चे नेतृत्व अॅड रितेश पाटील यांनी केले. कोर्ट बी संघाने फलंदाजी घेऊन श्री. हारणे, अॅड. भद्रिके, अॅड. जाधव यांनी फटकेबाजी करीत 5 षटकांत 50 धावांचे आव्हान कोर्ट ए संघासमोर उभारले. न्यायाधीश धोंडगे व अॅड. सोमनाथ दळवी यांनी चार षटकांमध्येच हे आव्हान पूर्ण केले. हाच संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
बक्षीस वितरण युवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. नितीन गायकवाड, माजी अध्यक्ष अॅड. उमेश पवार, अॅड. अभिजित बलकवडे, अॅड. गजानन पवार, अॅड. संजय टेंबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. विकास म्हात्रे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अॅड. सचिन चाळके यांनी मानले.
उपक्रम यशस्वितेसाठी वकील सर्वश्री जयेश तावडे, संदीप पवार, जितेंद्र इनामदार, मिलिंद सुरावकर, योगेश मानकावळे, मयूर कांबळे, आनंद गायकवाड, संदेश धावारे, नितीन तोरणे, अंकुश माने, जाकीर आढाळ, शहानवाज खान, रमेश खंडगळे, सतीश पवार, तृशांत आरडे, जे. डी. पाटील, अमोल पडवळ, रोडेकर, सदावर्ते, फोंडके, श्री. राऊत, श्री. भाऊसाहेब, श्री. चौधरी आदींनी मोलाचे सहकार्य केले.
Check Also
पनवेल पंचायत समितीची आमसभा
नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश पनवेल: रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीची सन 2024-25ची आमसभा शुक्रवारी (दि. …