नागोठणे : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नागोठणे शहरातील एका इमारतीच्या गोदामावर मध्यरात्री धाड टाकून पान मसाल्याच्या गोणींसह विविध प्रकारची रसायने ताब्यात घेतली. या मालाची किंमत 10 लाख 27 हजार 580 रुपये इतकी असून, या प्रकरणी इमारतीच्या मालकासह एकूण चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर नागोठणे येथील शंभू पेट्रोल पंपाच्या समोर दक्षिण बाजूला असलेल्या एका बिल्डींगच्या तळमजल्यावरील रूम नं. 4मध्ये राज्य शासनाने बंदी घातलेल्या पान मसाल्याचा साठा असल्याची खबर पेणच्या अन्न व औषध प्रशासनाला खबर मिळाली होती. त्यानुसार या पथकाने पोलिसांच्या सहकार्याने धाड टाकून कारवाई केली.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …