Breaking News

उरणमध्ये मामाचा भाचीवर अत्याचार

उरण : बातमीदार

उरण तालुक्यातील जासई डुंबा येथे राहणार्‍या एका नऊ वर्षांच्या मुलीवर तिच्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बलात्कारप्रकरणी आरोपीविरोधात

उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जासई डुंबा येथील महिला कपडे धुण्यासाठी बाहेर गेल्यानंतर घरी एकटी असलेल्या तिच्या अल्पवयीन मुलीवर तिचाच मामा महेश भिमा भिडे याने घरात घुसून लैंगिक अत्याचार केला, तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात उरण पोलिसांनी भादंवि 376, 377, 506 आणि पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

दुसर्‍या घटनेत एनएडी (करंजा) येथील केव्ही विद्यालयात इयत्ता दुसरीत शिकणार्‍या सहा वर्षीय मुलीचा शिक्षक संभाजी जाधव यांनी विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मुलीने दिल्यानंतर आईने मोरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरोधात 354 (अ) व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Check Also

‘गीतगंधाली’तून उलगडला कर्मवीर अण्णांचा जीवनपट

सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर …

Leave a Reply