Breaking News

नागोठण्यापाठोपाठ कुरूळमधील गुटखा अड्ड्यावर धाड

पाली ः प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असताना रायगड जिल्ह्यातील

खेड्यापाड्यात राजरोसपणे गुटखाविक्री होत असल्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. पेण, नागोठणे येथील अवैध गुटखा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर अलिबाग कुरूळ येथील गुटखा जप्त करण्यात आला. अशा दिवसा व रात्री केव्हाही होणार्‍या बेधडक कारवाईमुळे गुटखाकिंग पुरते धास्तावले आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बुधवारी

(दि. 29) आठ वाजण्याच्या सुमारास आरोपीने (रा. धावीर, ता. रोहा) मौजे कुरूळ नवेनगर अलिबाग येथे शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवला होता. त्या ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली.

या वेळी 10,667 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. आरोपीविरोधात अलिबाग पोलीस ठाणे येथे गु. रजि.नं. 21/2020  भादंवि कलम 188, 272, 273सह अन्नसुरक्षा व मानदे कायदा सन 2006चे कलम 26 (2) (4), 59, 31 (1)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सपोनि. गावडे  करीत आहेत.

रायगड जिल्ह्यात अवैध गुटखा साठवण व विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. व्यसनांमुळे बरबाद होणार्‍या तरुणाईला वाचविण्यासाठी संपूर्ण राज्यात शंभर टक्के गुटखाबंदी यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहून काम करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply