Breaking News

कुरुंग जोडरस्ता खड्डेमय; ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग गावाला जोडणार्‍या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झाली असून, संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्जत-मुरबाड राज्य महामार्गापासून वारे-कुरुंग रस्ता जरी सुस्थितीत असला तरी कुरुंग गावात जाण्यासाठी असलेल्या जोड़ रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कुरुंग गाव हे डोंगराळ भागात असून, ताडवाडी-खांडस या मुख्य रस्त्यापासून आत फक्त दोनशे मीटर लांबीचा हा जोड रस्ता आहे. 170 लोकसंख्या व 41 घरांची वस्ती असलेल्या कुरुंग गावाला जोडण्यासाठी वीस – पंचवीस वर्षापुर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमांतून जोड रस्त्यांचे काम केले होते. त्यानंतर या जोड रस्त्याचे काम केले नसल्याने खडी निघाली आहे. त्यामुळे या जोड रस्त्यात खड्डे मोठंमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच रस्ता तीव्र चढावाचा असल्याने गावकर्‍यांना वाहन चालवणे मोठ्या जिकरिचे झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील गावकरी बांधकाम विभागाकडे जोडरस्ता दुरुस्तीची मागणी करीत आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कुरुंग ग्रामस्थांत नाराजी आहे.

आमच्या कुरुंग गावाला जोडणारा रस्ता अनेक वर्षांपासून नादुरूस्त आहे. संपुर्ण रस्त्यात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर रहदारी करणे, ग्रामस्थांना मुश्किल झाले आहे. आम्ही रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठविला आहे, लवकरच रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे .

– बबन भालेराव, सामाजिक कार्यकर्ता, कुरुंग, ता. कर्जत

आमच्या गावाला जोडणार्‍या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे, त्यात हा रस्ता चढावाचा असल्याने रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. या वर्षी अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने  धोकादायक अवस्थेत आहे. या संदर्भात बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी.

-हरिचंद्र बाबू पाटील, माजी उपसरपंच, वारे ग्रुपग्रामपंचायत, ता. कर्जत

आम्ही गावकर्‍यांनी वारंवार बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे, परंतु त्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले आहे. कार्यकर्ते व लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावर वाहन चालविणेही कठीण झाले आहे. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

-चंद्रकांत भालेराव, पोलीस पाटील, कुरुंग, ता. कर्जत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply