Tuesday , February 7 2023

धाकटा खांद्यात कोरोना लसीकरण केंद्र

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी (दि. 28) पनवेल महापालिकेच्या धाकटा खांदा येथील श्री. गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्र.06 येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ही लसीकरण मोहिम राबविण्यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, डॉ. गोसावी, डॉ.भोईटे यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमास नगरसेवक मनोहर जानू म्हात्रे, विलास पाटील, बाळकृष्ण जानू म्हात्रे, हरेश म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, रवींद्र पाटील, रवींद्र डोंगरे, किशोर म्हात्रे, अर्जुन भगत, विनायक म्हात्रे, विनोद भगत, सतीश पाटील, लोकेश पाटील, भास्कर भगत, प्रवीण पाटील, नितेश म्हात्रे, मनोहर नारायण म्हात्रे, संजय पाटील, रोहित अटवणे, रुपेश आंबोलकर, डॉ. सरिता महाजन, सायली ठकेकर, सहकारी वर्ग उपस्थित होता.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply