Monday , January 30 2023
Breaking News

उरणमध्ये सरस्वती पूजा व जागरण; आमदार महेश बालदी यांची उपस्थिती

उरण : वार्ताहर

वसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने गुरुवारी (दि.  30) उरण रेल्वे स्टेशन, नीलकंठेश्वर मंदिराजवळ सरस्वती देवी पूजन व जागरणचे आयोजन करणायत आले होते. आरती पांडे व त्यांचे कलाकार यांनी देवीची भावगीते गायली. भाविकांना मंत्रमुग्ध केले. यंदाचे 14 वे वर्ष आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उरणचे आमदार महेश बालदी, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर आदी उपस्थित होते. आमदार महेश बालदी यांना शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. वसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अमर श्रीवास्तव, उपाध्यक्ष संजयकुमार, सचिव ए. के. सिंह, पेट्रोन नेते पी. टी. चव्हाण (समाजवादी पार्टी, उरण तालुका, अध्यक्ष), खजिनदार राकेश कुमार, पेट्रोन आर. पी. मिश्रा, महासचिव रंजनकुमार व सर्व भाविक उपस्थित होते. सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी उरण नगरपरिषद विमला तलाव येथे देवीचे भावपूर्वक विसर्जन करण्यात आले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply