पनवेल : रामप्रहर वृत्त
यमुना शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या गव्हाण येथील न्यू इंग्लिश शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 31) उत्साहात साजरा झाला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षपदावरून बोलताना या संस्थेच्या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असे गौरवोद्गार काढले.
या वेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना परितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास उद्योजक जे. एम. म्हात्रे, कमळगिरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बबन पाटील, यमुना शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घरत, रघुनाथशेठ घरत, पांडुमामा घरत, वसंत म्हात्रे, महादेव कटेकर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, भाऊशेठ पाटील, काशिनाथ कोळी, प्रकाश देशमुख, शेखर देशमुख, चंद्रकांत घरत, रविशेठ पाटील, बाजीराव परदेशी, किसन पाटील, हरिभाऊ पाटील, मनोज फडकर, उत्तम कोळी, दामिनी कोळी, योगिता भगत, हेमंत पाटील, भाऊ भोईर, रोशन म्हात्रे, विजय घरत, वामनशेठ म्हात्रे, अरुण कोळी यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …