Breaking News

कुष्ठरोगी बांधवांना खाऊवाटप

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या कार्यकारिणीचे सदस्य अरविंद पोतदार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 20) पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का येथील गणेश कुष्ठरोग वसाहतीतील बांधवांना खाऊवाटप करण्यात आले.

पनवेल तालुका पत्रकार महासंघाची स्थापना झाल्यावर सदस्यांचे वाढदिवस केक कापून साजरे न करता त्या ऐवजी गरजूंना मदत करून साजरे करू या असे ज्येष्ठ सल्लागार सुनील पोतदार आणि प्रमोद वालेकर यांनी सांगितले होते. कुष्ठरोग वसाहतीतील ज्येष्ठांनी आशीर्वाद देत संघाचे सचिव अशोक आंबेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

या वेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार सुनील पोतदार,  प्रमोद वालेकर, अध्यक्ष रत्नाकर पाटील, प्रदीप वालेकर, सुधीर पाटील, वाघपंजे, संजय कदम, गणेश कुष्ठरोग सेवा संघाचे प्रकाश पाटकर, विलास कदम, शैला आंबेकर, स्वाती केंडे आणि अनीता जाधव उपस्थित होत्या.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply