Breaking News

शेकापला झटका; कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या ऐन धामधुमीत बारापाडा येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते अजगरशेठ दाखवे, अकलाखशेठ बडे, इक्रामा बडे यांनी सोमवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले.

या पक्षप्रवेश कार्यक्रमास कर्नाळा ग्रामपंचायतीतील सरपंचपदाचे उमेदवार गणेश पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश म्हात्रे, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, खैरुद्दीन दाखवे, उमेश पाटील, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी कर्नाळा ग्रामपंचायतीतील भाजप-शिवसेना युतीचे विकास पाटील, रोशनी पाटील, जिशान दाखवे, कमला पाटील, जगदीश जंगम, सुनीता वाघमारे, सुरेश हापसे, तुळसा हापसे या उमेदवारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट घेऊन सदिच्छा स्वीकारल्या.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply