Breaking News

उरणमध्ये डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्याच्या विल्हेवाटसाठी प्रकल्प

उरण : वार्ताहर

उरण शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी उरण नगर पालिकेने बायो मायनिंग प्रकल्प सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि पालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

बोरी पाखाडी येथिल डम्पिंग ग्राउंडवर सुरू झालेल्या या प्रकल्पात 2007 पासून साठलेल्या कचर्‍याचीही विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे उरण शहरातील कचर्‍याचा प्रश्न सध्यातरी मार्गी लागला आहे. उरण नगर परिषदेला डम्पिंग ग्राऊंडसाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांनी 2007 साली बोरी पाखाड़ी येथील इनामदार नगर हद्दीत समुद्रालगत एक हेक्टर क्षेत्राचा भूखंड दिला होता. त्या जागेत उरण शहरातील कचरा टाकला जात होता, मात्र या भूखंडा लगत असणार्‍या हनुमान कोळीवाडा या गावाला कचर्‍याच्या दुर्गंधीचा त्रास होत असे, तसेच हा भूखंड या गावाच्या पुनर्वसन येत असल्याने त्या ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने या डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावून हा भूखंड वनखात्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.

नगर पालिकेने या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले असून हे काम भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. त्यासाठी सुमारे 10 लाख 45 हजारांचा खर्च होणार आहे. सुमारे तीन महिन्यांत हे काम संपवून कचर्‍यापासून माती व खत निर्माण होणार आहे. कचर्‍याची विल्हेवाट लावून हा भूखंड वनखात्याकडे वर्ग करण्यात येईल, असे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सांगितले.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply