कर्जत : बातमीदार
व्यापार उदीम आणि आपल्या नातेवाईकांकडे कर्जत तालुक्यातील प्रवाशी मोठ्या संख्येने पुणे भागात जात असतात. मात्र पुण्याकडे जाण्यासाठी असलेल्या अपुर्या व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असतात. त्यामुळे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने रेल्वे मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात पनवेल मार्गे जाणार्या व येणार्या सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्यां तसेच पुणे रेल्वे स्थानकातून सुटणार्या इंटरसिटी आणि उद्यान एक्स्प्रेसला कर्जत रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा देण्यात यावा, सह्याद्री एक्स्प्रेसला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी केली आहे. दादर ते कल्याण दरम्यानच्या रेल्वे प्रवाशांना पुणे, कोल्हापुर दिशेला जाण्यासाठी मुंबई लोकलने गर्दीतून कल्याण रेल्वे स्थानकात यावे लागत आहे. तरी, सह्याद्री एक्स्प्रेसलाही ठाणे स्थानकात अधिकृत थांबा देण्यात यावा, अशा मागण्याचे निवेदन कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या वतीने सचिव प्रभाकर गंगावणे यांनी मुंबई विभागीय महाव्यवस्थापक आणि मुख्य महाव्यवस्थापक यांना दिले आहे.