Breaking News

विराट पुन्हा अपयशी; झाला नकोसा विक्रम

वेलिंग्टन : वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाअखेर भारताने 5 बाद 122 धावा केल्या. भारतीय डावात कर्णधार विराट कोहली फक्त 2 धावा करून बाद झाला. कर्णधार म्हणून विराटच्या नावावर असा एक विक्रम नोंदला गेला आहे जो त्याला कधीच आठवू नये असे वाटेल.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीची जोडी, त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कोहली झटपट बाद झाले. विराट 7 चेंडूंत 2 धावांवर माघारी परतला. भारतीय कर्णधाराद्वारे न्यूझीलंडविरुद्धची ही दुसर्‍या क्रमांकाची खराब कामगिरी आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने न्यूझीलंडमधील पहिल्या कसोटी डावात 2 धावा केल्या होत्या. त्याआधीच्या कर्णधारांचा विचार केल्यास नवाब पटौदी 11, सुनील गावसकर नाबाद 35, बिशन सिंह बेदी 30, मोहम्मद अझरुद्दीन 30 आणि वीरेंद्र सेहवागने 22 धावा केल्या होत्या. भारतीय कर्णधाराद्वारे पहिल्या डावात सर्वांत जास्त धावा करण्याचा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आहे. धोनीने न्यूझीलंडमधील पहिल्या कसोटी (18 मार्च 2009) डावात 123 चेंडूंत 47 धावा केल्या होत्या, तर दुसर्‍या क्रमांकावर सुनील गावसकर आहेत. त्यांनी नाबाद 35 धावा केल्या होत्या.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply