श्रीवर्धन ़: तालुक्यातील भरडखोल ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. या कुत्र्याने मंगळवारी (दि. 4) दुपारी केलेल्या हल्ल्यात दोन लहान मुले जखमी झाली असून, सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावात पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत निर्माण केली असून, त्याने आजतागायत पाच ते सहा व्यक्तींवर हल्ला केला आहे. या कुत्र्याने मंगळवारी दुपारी चार वर्षांचा सुरज पावशे आणि नऊ वर्षांचा सोमेश्वर पावशे यांच्यावर हल्ला केला. त्यात सुरजच्या नाकाचे मांस निघाले असून, सोमेश्वरच्या उजव्या गालाचा चावा घेतला आहे. या दोघांना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर डॉ. भरणे उपचार करीत आहेत.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …