Breaking News

भारतमाता की जय! वंदे मातरम्!! देशहितासाठी ‘सीएए’ हवाच!!! पनवेलमध्ये भाजपची विराट बाइक रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त

सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी पनवेल परिसरात भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी

(दि. 9) विराट मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या वेळी भारतमाता की जय, वंदे मातरम्सह सीएए समर्थनाच्या घोषणांनी पनवेल परिसर दणाणून गेला. या रॅलीला कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

खांदा कॉलनी येथील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून या रॅलीला प्रारंभ झाला. हातात भारताचा झेंडा, गळ्यात टोपी तसेच वुई सपोर्ट सीएए, इंडिया वॉन्ट सीएए, अशा आशयाचे फलक घेतलेले कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. महिलांचीही उपस्थिती दखल घेण्याजोगी होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वत: दुचाकीवर स्वार होऊन घोषणा देत रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

या रॅलीत आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सभापती, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका, जि. प., पं. स. सदस्य, विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, पोदी, तक्का आदी परिसरात फिरवून ‘सीएए’विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नवीन पनवेलमधील सीकेटी विद्यालयात रॅलीची सांगता झाली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply