Breaking News

सीकेटी महाविद्यालयात जीवशास्त्रातील समकालीन मुद्यांवर दोन दिवसीय चर्चासत्र

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात जीवशास्त्रातील समकालीन मुद्दे या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र 4 व 5 फेब्रुवारीला घेण्यात आले.

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, भारत सरकार यांच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या या चर्चासत्रात 36 प्राध्यापक व 105 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. चर्चासत्राचे उद्घाटन सोसायटी इंडियाचे मायक्रोबायोलॉजिस्ट अध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांच्या भाषणाने झाले. दुपारच्या सत्रात झाँसीच्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. किसन कोडम यांची व्याख्याने झाली.

चर्चासत्राच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात भोपाळच्या संत हिरडाराम महिला महाविद्यालयाचे जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. सुगंधा सिंग यांच्या व्याख्यानाने झाली. दुपारच्या सत्रात मुंबईच्या हापकिनचे वरिष्ठ संशोधक डॉ. उषा पद्मनाभन व मुंबई भवन्स कॉलेजचे माजी उपप्राचार्य डॉ. परवेश पांड्या यांची व्याख्याने झाली. चर्चासत्रात कृषी जैवतंत्रज्ञान, जैवविविधता, प्रतिजैविके, आधुनिक लसी, प्रदूषणावरील जैविक उपाय या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चासत्रात एकूण 12 शोध निबंधांचे मौखिक व 28 शोधनिबंधांचे  चित्रमय सादरीकरण करण्यात आले.

 या शोधनिबंधाचे परीक्षण डॉ. दिपक ठाकरे, डॉ. नागेश मलिक, डॉ. नितींकुमार पाटील, डॉ. सुचंद्रा दत्ता, डॉ. मानसी ठाकूर, डॉ. अमोघ ठक्कर,  डॉ. सुगंधा सिंग, डॉ. प्रमोद घोगरे व डॉ. राजेंद्र चौरे यांनी केले. मौखिक सादरीकरणात प्राध्यापिका निलीमा तिदार यांना प्रथम व प्राध्यापक गणेश साठे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. चित्रमय सादरीकरणात अनुप कुमार यादव व बीगेल फर्नांडिस यांना प्रथम व कुमारी प्रीती सुब्रमण्यन यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी चर्चासत्राचे समन्वयक म्हणून कार्यभार सांभाळला. या नियोजनात उपप्राचार्य डॉ. संजय पाटील यांचे सहकार्य लाभले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी आयोजन सचिव म्हणून प्राध्यापक निलेश वडनेरे  व सहसमन्वयक म्हणून डॉ. मंदा मात्रे, प्राध्यापिका  धनश्री बर्वे आणि डॉ. सीमा कोकिटकर यांनी आपल्या विभागीय सहकार्‍यांसह विशेष परिश्रम घेतले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.  टी.  देशमुख,  अध्यक्ष अरुणशेठ भगत व कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल पालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply