वावर्लेत फार्म हाऊस खरेदी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल गोगावले यांनी चौकजवळील वावर्ले येथे फार्महाऊससाठी जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीच्या खरेदी दस्तऐवज नोंदणीसाठी ते दोघे शुक्रवारी (दि. 7) खालापूरला आले होते. यावेळी दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक श्री. वैद्य आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी त्यांचे स्वागत केले. अजय-अतुल यांना पाहण्यासाठी गर्दीही झाली होती. अनेकांनी सेल्फीसह फोटोही काढले. अनेक राजकारण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, उद्योत, व्यापार आदी क्षेत्रातील मान्यवर तसेच लेखक, पत्रकार आणि वरिष्ठ अधिकार्यांचे फार्महाऊसेस चौक-खालापूर परिसरात आहेत. त्यात आता अजय-अतुल यांच्या फार्महाऊसची भर पडणार आहे.