Breaking News

प्रो-हॉकी लीग; बलाढ्य बेल्जियमवर भारताची मात

भुवनेश्वर : वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिकची पूर्वतयारी म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रो-हॉकी लीग स्पर्धेत सहभागी हॉकी इंडियाने पहिल्या फेरीत नेदरलँडला पराभूत केल्यानंतर, बेल्जियमविरुद्धचा पहिला सामनाही 2-1च्या फरकाने जिंकला आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा हॉकी स्टेडीयमवर हा सामना रंगलाज्यात भारताने धडाकेबाज खेळ करीत विजय मिळवला.

गोलकिपर पी. आर. श्रीजेश या सामन्याचा हिरो ठरला. सुरुवातीच्या सत्रापासून त्याने बेल्जियमच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंच्या चाली हाणून पाडल्या. सोबतच धडाकेबाज खेळ करीत बेल्जियमवर दबाव आणला. मनदीप सिंहने दुसर्‍या मिनिटाला सुरेख मैदानी गोल करीत सामन्यात आघाडी घेतली. यानंतर बेल्जियमने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले, मात्र मध्यांतरापर्यंत भारताने आपली 1-0 अशी आघाडी टिकवून ठेवली. मध्यांतरानंतर 33व्या मिनीटाला बेल्जियमकडून गॉथिअर बोकार्डने पेनल्टी कॉर्नरवर श्रीजेशचा बचाव भेदत बेल्जियमला सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधून दिली. तिसर्‍या सत्रात भारतालाही पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती, मात्र भारतीय खेळाडू यात अपयशी ठरले. अखेरीस चौथ्या सत्राच्या सुरुवातीला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर मारलेल्या फटक्याला रमणदीपने हलकेच गोलपोस्टची दिशा दाखवत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बेल्जियमने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले, मात्र भारताच्या बचावफळीसमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply