Breaking News

पाटणेश्वर येथील संकेत म्हात्रेला जलतरणात ‘सुवर्ण’

श्रीगाव : प्रतिनिधी

गुजरातच्या वडोदरा येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनमध्ये जलतरण स्पर्धेत

पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथील संकेत केशव म्हात्रे सुवर्णपदक पटकाविले. 100 मीटर फ्री स्टाईल प्रकारात त्याने ही कामगिरी केली.

नॅशनल मास्टर गेम असोसिएशनच्या माध्यमातून वडोदरा येथे 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान    विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील जलतरण देशभरातील 100हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करीत संकेत म्हात्रे याने 25 वर्षे वयोगटात 100 मीटर फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल रतन सिंधू, जनरल सेक्रेटरी विनोद कुमार यांच्या हस्ते म्हात्रे यांना पदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

संकेत हे पाटणेश्वर गावातील सेवानिवृत्त वनपाल केशव म्हात्रे यांचे द्वितीय पुत्र आहेत. त्यांनी तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होऊन दीडशेहून अधिक पारितोषिके पटकावली आहेत. वडोदारा येथील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने त्यांच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply