पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आखणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी माजी विद्यार्थी समन्वय समितीची बैठक रविवारी (दि. 9) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा फुले महाविद्यालय यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यासंदर्भातील चर्चा रविवारी झालेल्या माजी विद्यार्थी समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला आमदार बाळाराम पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्य अरुणशेठ भगत, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, संजीवन म्हात्रे, अतुल पाटील, प्राचार्य गणेश ठाकूर यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.