Breaking News

एसईझेडसंदर्भात पेणमधील शेतकरी शासनदरबारी

आमदार रविशेठ पाटील यांच्यामार्फत घेतली महसूलमंत्र्यांची भेट

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील महसूली गावातील मे. मुंबई एसईझेड लि. कंपनीने संपादित केलेल्या व खरेदीखताने नावे केलेल्या शेतजमीनीच्या सात बाराच्या उतार्‍यावरील कंपनीची कब्जेदारीसदरी झालेली नोंद रद्द करण्यासाठी तसेच ही शेतजमीन या शेतकर्‍यांना परत देण्यासाठी पेणमधील शेतकरी संघटनेने शुक्रवारी (दि. 24) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची आमदार रविशेठ पाटील यांच्यामार्फत मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनातून त्यांनी खारेपाट विभागातील शेतकर्‍यांच्या वतीने मागणी केली.

या निवेदनातून सविस्तर बाजू मांडण्यात आली आहे. मे. मुंबई एस. ई. झेड लि. कंपनीने विशेष भूसंपादन अधिकारी काळ प्रकल्प माणगाव यांच्यामार्फत खारेपाट विभागातील शेतजमीनींचे भुसंपादनाचे संमत्ती निवाडे 24 ऑगस्ट 2009 व 31 ऑगस्ट 2009 या कालावधीत कुलमुखत्यारपत्राच्या आधारे केलेले आहेत. या भूसंपादनाचे संमत्ती निवाडे हे करणेकरिता 30 नोव्हेंबर 2006 रोजीच्या जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशात व परवानगी मध्ये संमत्ती निवाड्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाच्या परवानगी निवाडे केल्याचे स्पष्ट होत आहे तसेच मुंबई एसईझेड कंपनीने 8 जून 2007 रोजी शासनाबरोबर अ‍ॅग्रीमेंट केलेले असून त्या अग्रीमेंटमध्येदेखील संमत्ती निवाड्याचा उल्लेख नाही  तसेच अग्रीमेंटसोबत जे पुनर्वसन पॅकेज म्हणून जाहीर केलेले आहे त्याचीदेखील पूर्तता आजमितीस केलेली नाही.

महाराष्ट्र प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कायदा 1999च्या कलम 12 (1)(2) अन्वये खरेदी केलेल्या जमिनीनुसार पुनर्वसन पॅकेज न दिल्याने या भूसंपादन जमिनीची संमती निवाड्याने व खरेदी खताने हस्तांतरित झालेल्या जमिनीचा व्यवहार हा कायदेशीर नाही व त्यामुळे कलम 12 (3) स्पष्टपणे उल्लंघन झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या वेळी निवेदन स्वीकारल्यानंतर याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात, येईल असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. निवेदन देण्यासाठी अ‍ॅड. नंदू म्हात्रे, संदेश पाटील, नारायण म्हात्रे, अशोक पाटील, विलास पाटील, देविदास वर्तक, शशिकांत म्हात्रे, समीर पाटील, प्रवीण पाटील, बाबूराव पाटील उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply