Breaking News

सहकाराचा स्वाहाकार म्हणजे कर्नाळा बँक! शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी

आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांची प्रचंड आर्थिक परवड होत आहे. यात वृद्ध, महिला, मुलाबाळांसह ग्रामपंचायती, सोसायट्या, छोटे-मोठे उद्योजक, स्वयंसेवी संस्था, सरकारी व निमसरकारी विभागांचेही पैसे अडकले आहेत. असे असताना बँक आणि बँकेशी संबंधित मंडळी मात्र चालढकल करीत आहेत. या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करणारी मालिका…

सहकाराचा स्वाहाकार कसा करावा याचे मूर्तिमंत उदाहरण पनवेलसह रायगड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना शेकाप नेते, माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या रूपाने पाहावयास मिळाले आहे. मिळालेल्या अधिकारांचा उन्मत्तपणे हवा तसा वापर आणि कायद्याला धाब्यावर बसवून संबंधित सहकारी संस्थांना कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व संचालकांनी दिलेले जबाब पाहता या राज्यातील सरकार काय करीत आहे, असा प्रश्न रायगडवासीयांच्या मनात निर्माण

होत आहे.

बँकेचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी बँकेच्या पोटनियमातील मार्गदर्शक तत्त्वे कामी येत असतात. या तत्त्वांचे पालन करून बँकेचा कारभार करणे बंधनकारक असते. अशा रीतीने काम करणार्‍या बँका व्यवस्थित चालल्याची उदाहरणे आपल्याला आसपास पाहायला मिळतात, मात्र या मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली दिली की 24 वर्षांतच बँकेचे कसे दिवाळे वाजते हे कर्नाळा बँकेच्या आजच्या अवस्थेकडे पाहिल्यानंतर कळते.

केवळ आपली आणि आपल्या बगलबच्चांची तुंबडी भरायची या उद्देशाने काम करणारे कर्नाळा बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, संचालक मंडळ यांनी बँकेच्या नियम, पोटनियम आणि मार्गदर्शक तत्त्वांना कसा हरताळ फासला हे रायगडमधील सहकारी संस्था जिल्हा विशेष लेखापरीक्षकांच्या अहवालावरून धडधडीतपणे समोर येते.

आश्चर्याची बाब म्हणजे बनावट कर्ज खाते निर्माण करायचे, तसेच या कर्जखात्याचे कर्जदारही घोटाळेबाज आणि त्यांचे जामीनदारदेखील किती विश्वासार्ह असावेत, हा प्रश्न खुद्द कर्नाळा बँकेलाच पडला नसल्याने इतर सामान्यांची काय कथा? त्यापुढची कमाल म्हणजे या बोगस खात्यांमधून दिलेल्या कर्जातील रकमाही इतर वेगवेगळ्या ठिकाणी वळविण्याचे बेकायदेशीर कसब याच बँकेतील जबाबदार व्यक्तीने दाखविल्याचे दिसून येते.   कर्नाळा बँकेचे खातेदार असलेल्या लोकांना ज्यांना आपण आपले लोकप्रतिनिधी म्हणून राज्याच्या विधानसभेवर चार वेळा पाठवले होते, त्याच विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्नाळा बँक मात्र डबघाईला आली हे पाहून आश्चर्य वाटते. या घोटाळ्यामुळे विवेक पाटील यांच्यावर आता उरलासुरला विश्वासही राहिला नाही, अशी भावना समस्त रायगडकरांमध्ये आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply