Breaking News

कामोठ्यात हळदी-कुंकू व बचतगट मेळावा

कामोठे : रामप्रहर वृत्त : दिशा महिला मंच तर्फे हळदी-कुंकू आणि बचतगट मेळाव्याचे आयोजन कामोठे येथील नालंदा बुध्दविहार येथे शनिवारी (दि. 8) करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदी-कुंकूची सुरुवात विधवा महिलांना हळदी-कुंकूचा मान देऊन करण्यात आली. पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला कुठेतरी आळा बसावा व  सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच मानसन्मान मिळावा, जर तिच्या हाताने केलेला नैवेद्य देवाला चालतो तर आपण हा भेदभाव का करावा. हीच भावना ठेऊन हळदी-कुंकूचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या सहाय्यक उपायुक्त तेजस्विनी गलांडे, बचत गट सल्लागार स्नेहा रणदिवे, सोनल इंगवळे, रायगड जिल्हा बचत सल्लागार श्रद्धा जाधव आदी महिला उपस्थित होत्या. गलांडे आणि स्नेहा रणदिवे यांनी महिलांना बचत गटाचे मार्गदर्शन केले. महिलांनी आपापल्या व्यवसायाचा परिचय देत हळदी-कुंकू बचत गट मेळावा यशस्वीरीत्या झाला.

विद्या मोहिते यांनी कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा सांभाळली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुशी सावर्डेकर, कविता पाखरे, अनुप्रिया, मनिषा शिंदे, उषा डुकरे, संगीता राऊत, रुक्मीणी अर्जुन, रेखा ठाकूर, रुपाली होगडे आदी महिलांनी विशेष सहकार्य केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply