रोहे : प्रतिनिधी
निसर्गातील कुठल्याही घटनेला कार्यकारण भाव असतोच, तो शोधला पाहिजे. तसे न केल्यास बाबा, बुवा यांचे फावते व त्यांची संस्थाने उभी राहतात, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) चे रायगड जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर यांनी रविवारी (दि. 5) येथे केले.
अंनिसतर्फे रोह्यात रविवारी एक दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. त्या वेळी उपस्थितांना विवेक सुभेकर मार्गदर्शन करीत होेते. अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी या वेळी अनेक वैज्ञानिक चमत्कार करून दाखवले व त्यामागील कार्यकारण भाव उलगडून दाखवले.
रोहा शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार राक्षे यांनी प्रास्ताविक केले. पेण शाखेचे कार्याध्यक्ष श्रीनिवास गडकरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चांगलाच रंगला. प्रशिक्षण पूर्ण करणार्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्र देण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रोहा शाखेचे दीपक शिर्के, प्रमोद खांडेकर, कुमार देशपांडे, चंद्रशेखर सावंत यांनी विशेष मेहनत घेतली.