Monday , June 5 2023
Breaking News

महिलांनी लुटला फॅशन शोचा आनंद

खांदा कॉलनी : बातमीदार

नवीन पनवेलजवळील आदई येथील भव्य अशा अष्टविनायक गृहसंकुलामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सादर केलेला फॅशन शो हे प्रमुख आकर्षण ठरले. या वेळी महिलांनी विविध प्रांतातील वेषभूषा आणि रंगमंचावरील पदविन्यासाने रसिकांची प्रशंसा प्राप्त केली. प्रसिद्ध फॅशन केरिओग्राफर राधा कुलकर्णी यांनी सहभागी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

विविधतेतूून एकता हे सूत्र घेऊन गृहसंकुलामधील रहिवासी महिलांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली केली. त्यानंतर सानिका केळकर यांनी गणेशवंदना सादर केली. पुढे महिलांनी गायन, नृत्य व अभिनय आदी कलाप्रकारांचे सुरेख सादरीकरण केले. श्रेयस केळकर याने गायिकांना संवादिनीसाथ केली. नाजनीन पालेेेेकर यांनी बहारदार सूत्रसंचालन करून रंगत आणली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोसायटीतील पुरुषवर्गानेही मोलाचे योगदान दिले.

अहोरात्र संसाराच्या रामरगाड्यात गुंतलेल्या महिलांना आनंदाचे काही क्षण मिळावे यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. यातून महिलांना आपल्या कलागुणांच्या सादरीकरणासाठी सन्मानजन्य व्यासपीठ मिळाले. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत झाली. पुरुषवर्गानेही आम्हा महिलांना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन दिले.
-नाजनीन पालेकर,  रहिवासी, अष्टविनायक गृहसंकूल

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply