Breaking News

स्काऊट-गाईड निसर्ग शिबिर 2020 उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी

शिक्षणासोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (दि. 11) स्काऊट-गाईड निसर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरास पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, उद्योजक वैभव देशमुख, प्रा. संतोष चव्हाण, पत्रकार गणेश कोळी, सुमंत नलावडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका वर्षा ठाकूर यांनीही या शिबिरास सदिच्छा देऊन शिबिराच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त समाजसेवा, स्वयंशिस्त, स्वावलंबन, श्रममूल्य व इतर मूल्यांची रूजवणूक करण्यात आली. तसेच परिसर स्वच्छता व पर्यावरण संवर्धन यासंबंधी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी झेंडागीत, प्रार्थना, स्फूर्तिगीत, तंबू सजावट, शेकोटी कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या वेळी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मला येथे येऊन प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखे वाटले. स्काऊट गाईड एकसंघ राहण्याची शिकवण देत असून समाजात आदर्शवत काम करीत आहे, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संचालक व आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख तसेच संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply