Breaking News

पत्रकार मयूर तांबडे यांना पुरस्कार

पनवेल ः बातमीदार

युथ फोरम सोशियल असोसिएशनच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि. 16) आयडियल पब्लिक स्कूलसमोर, देवीचा पाडा (तळोजा) येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पत्रकार मयूर तांबडे यांना स्व. भरत कुरघोडे जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युथ फोरम सोशियल असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत प्रबोधन, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणार्‍या परिसरातील नामवंतांना गौरविण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष केवल गायकवाड यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply