Breaking News

अमली पदार्थ विकणार्‍या टपर्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर

पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा विक्रीस त्याचप्रमाणे विदेशी सिगारेट लपूनछपून विकण्यावर बंदी असतानाही पनवेल शहरातील दीपा बारशेजारील टपरी त्याचप्रमाणे विनम्र हॉटेलशेजारील टपरी येथील टपरीचालक रात्रीच्या वेळी पिशव्या भरून मोठ्या प्रमाणात गुटखा व विदेशी सिगारेट बिनधास्तपणे व शासनाचे नियम धाब्यावर बसवून विकत असल्याने त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस, महानगरपालिका व अन्न औषध प्रशासनाने धडक कारवाई करून नव्या नियमाप्रमाणे मोक्कांतर्गत कारवाई करावी व त्यांना धडा शिकवावा, अशी मागणी महिलावर्गाकडून करण्यात येत आहे.

शहरातील दीपा बारशेजारील अँथोनी याची टपरी त्याचप्रमाणे विनम्र बारशेजारील छोटेलाल याची टपरी पनवेल शहर पोलीस, महानगरपालिका व अन्न औषध प्रशासनाने धडक कारवाई करून सील केली असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवत त्या टपरीबाहेर सायंकाळच्या वेळेस पिशव्या भरून गुटखा, सुगंधी मसाला आणि विदेशी सिगारेट तसेच इतर मादक पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येत असून त्यांचा हा धंदा बिनदिक्कतपणे सुरू आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply