Breaking News

द्रुतगती मार्गावर टप्प्याटप्प्यात मेगाब्लॉक

पुणे ः प्रतिनिधी : पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण कालपासून खंडाळा येथील बोगद्याजवळील धोकादायक दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आल्याने पुढील आठवडाभर येथे टप्प्याटप्प्याने काही काळासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, काल येथे 15 मिनिटांचा पहिला मेगाब्लॉक घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती महामार्गावरील खंडाळा येथील बोगद्यादरम्यान ढिल्या झालेल्या दरडींचे दगड काढण्याचे काम 12 ते 20 मार्चदरम्यान करण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून काल सकाळी 10 वाजता 15 मिनिटांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या मेगाब्लॉकमुळे पुणे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक 15 मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आली होती. दिवसभरात पाच टप्प्यांत 15-15 मिनिटांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे खंडाळा बोगद्याजवळ वाहतूक दिवसभरातून पाच वेळा 15 मिनिटांकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, तसेच 15 मार्च रोजी दुपारी सव्वातीन वाजल्यापासून 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक चालू ठेवण्यात येणार आहे. याची पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार्‍या चालकांनी आणि प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.

दिवसभरात घेण्यात येणारा मेगाब्लॉक

(12 ते 20 मार्चदरम्यान)

1) ब्लॉक 1 – सकाळी 10 ते 10.15

2) ब्लॉक 2 – सकाळी 11 ते 11.15

3) ब्लॉक 3 – दुपारी 12 ते 12.15

4) ब्लॉक 4 – दुपारी 2 ते 2.15

5) ब्लॉक 5 – दुपारी 3 ते 3.15

Check Also

‘दिवाळी पहाट’ने पनवेलकर मंत्रमुग्ध महापालिकेकडून मतदान जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित …

Leave a Reply