नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेला देशातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारने रविवारी (दि. 17) परिपत्रकाद्वारे माहिती दिली. यासोबतच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवार (दि. 18)पासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच देशाला संबोधित करताना लॉकडाऊन वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार घोषणा करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मेट्रो, रेल्वे, विमानसेवा तसेच कॉलेज, शाळा, सिनेमागृह, धार्मिक प्रार्थनास्थळे बंदच राहणार आहेत. फक्त एअर अॅम्ब्युलन्सला परवानगी देण्यात आली आहे. राज्यांना रेड, ग्रीन, ऑरेंज झोन आता ठरवता येणार असून, हा निर्णय जिल्हाधिकार्यांना घेता येईल.
Check Also
अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’
आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …
RamPrahar – The Panvel Daily Paper