Breaking News

झारखंडच्या पुंडीची प्रशिक्षणासाठी निवड

रांची : वृत्तसंस्था
झारखंडच्या नक्षलग्रस्त भागातील आणि गरीब कुटुंबातील पुंडी सारु या मुलीने सर्व अडचणींवर मात करीत हॉकीपटू बनण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकलं आहे. अमेरिकन दुतावास आणि शक्तिवाहिनी या सामाजिक संस्थेतर्फे झारखंडमधील मुलींसाठी हॉकी कम लिडरशीप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यातील 107 मुलींमधून पाच जणींची अमेरिकत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये पुंडी सारुने आपले स्थान पक्क केले आहे.
झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील हेसल या नक्षलग्रस्त भागात पुंडी आणि तिचे कुटुंब राहते. आज पुंडीचे स्वप्न पूर्ण होत असले तरी यासाठी तिने बराच संघर्ष केला आहे. चार भावडांपैकी पुंडीचा दुसरा क्रमांक लागतो. पुंडी सध्या नववीत शिकते. काही महिन्यांपूर्वी पुंडीच्या बहिणीने आत्महत्या केल्यामुळे ती हॉकीपासून दूर गेली होती. एक काळ असा होता की पुंडीच्या परिवाराकडे हॉकीस्टिक घेण्याचेही पैसे नव्हते. यासाठी पुंडीच्या परिवाराने घरातली नाचणी विकली. त्यामधून आलेले पैसे आणि पुंडीला शिष्यवृत्तीतून मिळालेल्या 1500 रुपयांमधून घरच्यांनी नवीन हॉकीस्टिक विकत घेतली.
पुंडीचे वडील हे मजुरी करायचे, मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांच्या हाताला दुखापत झाल्याने ते सध्या घरीच असतात. दररोज हॉकी खेळण्यासाठी पुंडी आठ किलोमीटर सायकल चालवत खुंटीला जाते. आतापर्यंत पुंडीने अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. भारतीय महिला हॉकी संघातील निक्की प्रधान ही पुंडीची रोल मॉडेल आहे. अमेरिकेच्या मिडलबरी कॉलेजमध्ये पुंडीला 21 ते 25 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply