पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेल तालुक्यातील भिंगारवाडी येथे करण्यात येणार्या रस्त्याचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) झाले. भाजप युवा मोर्चाचे पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष योगेश लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त रस्त्याची भेट ग्रामस्थांना देण्यात येत आहे.
कार्यततत्पर लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होेत आहे. त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून वाधवा सिटी ते भिंगारवाडीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सात लाख 10 हजार रुपयांचा निधी खर्च करून करण्यात येणार आहे. भाजप युवा मोर्चाचे पळस्पे जि. प. विभागीय अध्यक्ष योगेश लहाने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
भूमिपूजन समारंभाला भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच सुभाष जेठू पाटील, कोन पंचायत समिती विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, भिंगारवाडीचे सरपंच रामदास खेत्री, बेलवलीचे सरपंच बबन पवार, शेडूंगचे उपसरपंच मच्छींद्र दुर्गे, बोर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य घनश्याम पाटील, भिंगारवाडी ग्रमापंचायतीचे सदस्य सतिष पाटील, माजी सरपंच निलेश पवार, युवा मोर्चा कोन पंचायत समिती विभागीय अध्यक्ष संदेश पाटील, उद्योजक सुनील पाटील, बुथ अध्यक्ष रवींद्र शिसवे, सांगडे गाव अध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी उपसरपंच तुळशीराम पाटील, माजी सदस्य रघुनाथ ठाकूर, गाव अध्यक्ष अशोक लहाने, शेडूंग सदस्य रवींद्र दुर्गे, मंगेश लहाने, संदेश लहाने, प्रवीण शिसवे, नरेश लहाने, प्रमोद ठाकूर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper