Breaking News

झाड कोसळून कारचे नुकसान

नवी मुंबई : बातमीदार

नेरूळ राजीव गांधी ब्रिजजवळ शिरवणे गावात जाणार्‍या रस्त्यावर झाड कोसळल्याने कारचा चुराडा झाल्याची घटना बुधवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडली.

राजीव गांधी ब्रिजजवळून शिरवणे गावात शिरताच रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केलेली असतात. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसात काही झाडे पडली होती तर काही झाडे कलांडली होती. शिरवणे गावात शिरताना बाजूला असलेल्या उद्यानातील कलंडलेले झाड सकाळी कोसळले. मोठ्या अवजाने नागरिक देखील भयभीत झाले. महाकाय वृक्ष थेट या वृक्षाखाली उभ्या असलेल्या कारवर कोसळल्याने संपूर्ण कारच यात उद्ध्वस्त झाली. सर्व काचा फुटून वरचा पत्रा पूर्ण चेपला गेला. मात्र सुदैवाने कोणासही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही.  झाड कोसळलेल्या भागत फांद्यांसह काचांचा चुराडा पडलेला पाहायला मिळाला. पालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने धाव घेत हे झाड कापून काढत परिसर मोकळा केला.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply