आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/02/bhagubai-changu-thakur-1-1024x576.jpg)
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीजचे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या लेक्चर सिरीजला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 23) भेट दिली. या लेक्चर सिरीजमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे राम आपटे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल गिरीश कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.