Breaking News

महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ खोपोली भाजपचे स्वाक्षरी आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी

महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत राज्यातील आघाडी सरकारला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीत स्वाक्षरी मोहीम आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शहरातील शेकडो महिलांनी या मोहिमेत भाग घेतला.

खोपोली शहरातील दीपक चौकात पार पडलेल्या या स्वाक्षरी मोहीम आंदोलनात अश्विनीताई पाटील, शोभाताई काटे, रसिका शेटे, स्नेहल सावंत, गीता मोहिते, निशा दळवी, सुमती महर्षी, सुनिता पाटणकर, वीणा सोमण, विनया परदेशी, प्रिती पाटील, राखी गणेशकर, उज्वला दिघे, अश्विनी अत्रे या पदाधिकार्‍यांसोबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, नगर परिषदेचे परिवहन सभापती तुकाराम साबळे, भाजपचे शहर सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी,  शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, संभाजी नाईक, माजी अध्यक्ष ध्रुव मेहेंदळे, जिल्हा चिटणीस सूर्यकांत देशमुख, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजय इंगूलकर, वामन दिघे, बंधू शहासने यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी

झाले होते. 

सध्याचे महाआघाडी शासन अत्याचार रोखण्यास पूर्णपणे अपयशी ठरले असून, या शासनाला जाग आणण्यासाठी भाजप याहूनही तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगून, अश्विनीताई पाटील यांनी, महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला नाही, महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे याकरिता सरकारने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांनीही, तहसील कार्यालयासमोर मंगळवारी होणार्‍या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी घ्यावे, असे आवाहन केले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply