अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. 25) जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आघाडी सरकारच्या गैरव्यवहाराबद्दल प्रामुख्याने शेतकर्यांची फसवणूक, महिलांवरील अत्याचार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या विविध योजना व कामांना देण्यात आलेली स्थगिती या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे भाजपच्या वतीने
सांगण्यात आले.अलिबागेत साधारण 500 कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, असे भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम धर्मा म्हात्रे यांनी म्हटले असून, सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत येथील तहसीलदार कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper