Breaking News

नेरळ धरणात अस्वच्छ पाणी आणि माती कचर्याचा ढीग

धरणातील गाळ काढण्याची मागणी

कर्जत : बातमीदार

नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरण परिसर अस्वच्छतेच्या खाईत सापडले आहे. धरणात माती आणि गाळ साचले असून पावसाळा तोंडावर आला असल्याने धरणातील गाळ काढण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायत धरणातील गाळ दरवर्षी काढत नसल्याने पाण्याचा साठादेखील कमी होत आहे. धरणातील गाळ काढण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांनी श्रमदान करण्याची तयारी दाखविली आहे.

नेरळ गावातील धरण ब्रिटिशकालीन असून, त्यात गणेश विसर्जन केले जाते.  माथेरानच्या डोंगरातून पावसाच्या पाण्याबरोबर या धरणात दगड धोंडे आणि माती वाळू वाहून येत असते. दरवर्षी हा गाळ धरणातून बाहेर काढला जात नाही. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. यावर्षी धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर जंगली वनस्पती वाढल्या आहे. 

दरवर्षी या धरणात गौरी- गणेश यांचे विसर्जन केले जाते, त्यामुळे धरणात जास्त पाणी साठा ठेवण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न असतो. त्यामुळे धरणातील गाळ आणि माती बाहेर काढण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र पावसाळा तोंडावर आला तरी धरणातील गाळ काढण्याबाबत ग्रामपंचायत कोणताही विचार करताना दिसत नाही.

मोहाचीवाडी येथील गोरख शेप यांनी या धरणात अनेक वर्षे साचून राहिलेला गाळ आणि माती काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी धरणातील गाळ काढण्यासाठी विद्यार्थी श्रमदान करायला तयार असल्याचे आश्वासन नेरळमधील टिपणीस महाविद्यालयाने ग्रामपंचायतीला दिले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply