Breaking News

नवीन पनवेलमध्ये रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी ब्लड बँक (पतपेढी), नवीन पनवेल यांच्यामार्फत आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, गार्डन व्हॉलीबॉल लीग नवीन पनवेल, संत शिरोमणी रोहिदास विकास मंडळ, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 41 रक्तदात्यांनी या वेळी रक्तदान केले. या वेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनचे अध्यक्ष गुरुदेव सिंग कोहली, सेक्रेटरी व्ही. एल. गुरमे, संत शिरोमणी रोहिदास विकास मंडळाचे अध्यक्ष कृष्णा गायकवाड, सेक्रेटरी श्री. पुगावकर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष व गार्डन व्हॉलीबॉल लीगचे संस्थापक अध्यक्ष किसन पवार, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे सेक्रेटरी बेलापूरकर, गार्डन व्हॉलीबॉल लीगचे सेकेटरी घोंगडे यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविला. या वेळी विरजी पटेल, राधाभाई, नरशी भाई, स्वप्नील पवार, गणेश पटेज, दिनेश, प्रशाद चांदोरकर, माने, राठोड, फिरोज, भिमराव, सत्या, पाटील, पणाले, कानपिळे, पाल, आबोकर, श्रीवास्तव, जाधव, अ‍ॅड. पिंजारी, तरेकर, मारुती रोकडे, ज्ञानेश्वर जोशी, गणेश, रवान, जाधव, कांबळे, डॉ. भंडारकर, निलेश पोटे आदी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply