कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठे येथे झालेल्या आमदार प्रशांत ठाकूर रायगड श्री 2019 जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत महेश भिंगाकर याने रायगड श्री किताब पटकाविला. त्याला 51 हजार रुपये, मानाचा पट्टा व चषक देऊन गौरविण्यात आले. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांतून शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेऊन या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रायगड बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या वतीने आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने रायगड श्री 2019 जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी (दि. 10) आयोजित करण्यात आली होती. कामोठे येथील सेक्टर 19 येथील पोलीस ठाण्यासमोर झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या स्पर्धेवेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, तसेच दिनेश शेळके, चंद्रकांत कडू, संदेश चिपळेकर, महेश फडतरे, सचिन म्हात्रे, अमित सावंत, मारुती आडकर, युवा नेते हॅप्पी सिंग आदी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करून खेळाडूंचे कौतुक केले. बुलडाणा चिखली येथे 16 व 17 मार्चला होणार्या महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी रायगड संघाची निवड या वेळी करण्यात आली.