Breaking News

रायगडमध्ये मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाबाबत सरकारची अनास्था

अ‍ॅड. निरंजन डावखरे यांना मंत्र्यांचे संदिग्ध उत्तर

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक व अन्य कारखान्यांमध्ये दुर्घटना घडल्यानंतर जखमी रुग्णांवर उपचारासाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारने संदिग्ध भूमिका घेतली आहे. यासंदर्भात विधान परिषदेतील भाजपचे सदस्य अ‍ॅड. निरंजन डावखरे, नागोराव गाणार आणि डॉ. परिणय फुके यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नावर राज्य सरकारतर्फे संदिग्ध लेखी उत्तर देण्यात आले. मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या मागणीबाबत राज्य सरकारने थेट उत्तर न देता या प्रश्नाला बगल दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील क्रिप्टझो कंपनीत 15 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या स्फोटात 18 कामगार जखमी झाले होते. अत्यवस्थ स्थितीतील कामगारांना ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथे तिघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनिमित्त रायगड जिल्ह्यात तातडीच्या अत्यावश्यक उपचारांसाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध नसल्याचे उघड झाले होते.
रायगड जिल्ह्यात द्वितीय श्रेणीच्या सेवा देणारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, मात्र, तृतीय श्रेणीची सेवा आवश्यक असल्यास रुग्णांना मुंबईला पाठविण्यात येत असल्याचे म्हटले आहे, पण तृतीय श्रेणीच्या सेवा देण्यासाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत सरकारकडून मौन बाळगले जात आहे.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply