Breaking News

रायगडात कोरोना लसीकरणाला वेग

39 टक्के नागरिकांचे दोनही डोस पूर्ण

लिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात 100 टक्के कोरोना प्रतिबंधात्मक ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात 89.05 टक्के नागरिकांचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस पूर्ण झाला असून, 38.45 टक्के लाभार्थ्यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत.
ज्या नागरिकांचा पहिला डोस बाकी आहे, तसेच ज्या नागरिकांचे पहिल्या व दुसर्‍या डोसमधील निर्धारित अंतर पूर्ण झाले आहे, त्यांनी लसीचा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
रायगडात 18 वर्षांवरील 21 लाख तीन हजार 509 लाभार्थी आहेत. आतापर्यंत 26 लाख 81 हजार 831 लसीचे डोस लाभार्थ्यांना देण्यात आले असून यामधील आठ लाख आठ हजार 747 लाभार्थ्यांना लसीचे दोनही डोस म्हणजे 16 लाख 17 हजार 494 डोस देण्यात आले आहेत, तर 10 लाख 64 हजार 337 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दोन लाख 30 हजार 425 लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत लसीचा एकही डोस घेतलेला नाही.
ज्या लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, तसेच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, मात्र दुसर्‍या डोसमधील निर्धारित अंतर पूर्ण झाले असूनही दुसरा डोस घेतलेला नाही. त्यांची यादी तयार करण्यात येत असल्याची माहितीही डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
कोरोना नियंत्रणात आला आहे, मात्र अद्याप पूर्ण धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा, वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत, एकमेकांसोबत बोलताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 569 लसीकरण केंद्र
रायगड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी 569 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच त्यांच्या अखत्यारीतील उपकेंद्रांमध्ये 245 लसीकरण केंद्र सुरू आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांच्या अखत्यारीत 28, तर पनवेल महानगरपालिकेच्या अखत्यारीत 28, तसेच खाजगी 268 लसीकरण केंद्र सुरू आहेत.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply